राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढत चालला आहे. त्यातच आता तिसरी लाट येण्याचे म्हटले जात आहे. अशातच लोकांच्या सुरक्षेसाठी सरकार निर्बंध लावत आहे.
मुंबईत लोकल प्रवासाकरीता ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मॉल मध्ये जायचे असल्यास हा ई -पास फायद्याचा ठरणार आहे.
ई – पास बनविणे अगदी सोपे आहे. घरबसल्या तुम्ही पास मिळवू शकता. यासाठी राज्य शासनाने वेब लिंक दिली आहे. हा युनिव्हर्सल पास तुम्ही बस किंवा रेल्वेचा प्रवासा करीता वापरू शकता. हा पास आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन विभागाने जारी केला आहे.
युनिव्हर्सल पास लसीकरणाचे दोन्ही डोज झालेल्यांसाठी आहे. सध्या कुठेही आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य प्रवासाला मनाई नाही.
नागपुरात हा पास तुम्ही मॉलच्या प्रवेशासाठी वापरू शकता. तसेच कोरोना लसीचे दोन्ही डोज झालेले कोविड प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) देखील तुम्ही मॉल मध्ये प्रवेशासाठी वापरू शकता असे नागपूरचे अति.आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.
ई-पास मिळविण्याची प्रक्रिया :
१) ज्यांना हा पास बनवायचा आहे त्यांनी https://epassmsdma.mahait.org ह्या संकेतस्थळावर भेट दयावी.
२) त्यानंतर तुम्हाला citizens मध्ये ‘universal pass for double vaccinated citizens’ या ऑप्शन वर क्लिक करावे.
३) त्यानंतर रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी जनरेट होईल. तो टाकल्यावर तुमचा फॉर्म पुढील पानावर उघडेल.
४) त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल आता तुम्हाला generate pass वर क्लिक करावे लागेल.
५) आता तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट size फोटो अपलोड करावा लागेल.
६) मग तुम्हाला सर्व अटी मान्य कराव्या लागतील आणि घोषणेवर क्लिक करावे लागेल.
७) त्यानंतर Apply वर क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक संदेश येईल, ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची नोंदणी झाली आहे.
८) आता तुम्ही ६-७ तासाने पुन्हा लॉगिन करून पास डाउनलोड करावा.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, ज्या खालीलप्रमाणे आहेत:-
-अर्ज करण्यासाठी तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
-लहान मुले यासाठी अर्ज करू शकत नाहीत.
-ज्याला नोंदणी करायची आहे, त्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झालेले पाहिजेत.