मुंबई: शिवसेनेचे धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते आत्ता उद्धव ठाकरेंना शोभणारं नाही. ते मवाळ आहेत. बिनकामाचे आहेत, म्हणून ज्याला जे चिन्ह शोभेल, तसं त्या माणसाला मिळायला हवं. पण आता ते न्याय प्रविष्ट असल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण ते स्वतःच म्हणतायत आता सगळे बाण निघून गेले. हे फक्त रिकाम टेकडे धनुष्य घेऊन बसलेत. त्यांना ते चिन्ह शोभणारं नाही. या चिन्हासाठी कुणीतरी रफटफ माणूस पाहिजे. जसे बाळासाहेब होते. त्यांना शोभायचं ते चिन्ह. यांना कुठलं तरी देऊन टाका लॉलीपॉप वगैरे. ते शोभेल, धनुष्यबाण शोभणारं नाही.”
संजय राऊतांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कौशल्याच्या जोरावर काही प्रश्न विचारले आणि ठाकरेंनी त्यांची थेट उत्तरं दिली, असं काही नाही. प्रश्नही आधीच माहित होते आणि त्यांची सडलेली उत्तरंही माहित होती.”, अशी टीका त्यांनी केली. एकीकडे खरी शिवसेना कुणाची? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची हा प्रश्न न्यायालयात गेला आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्लीही उडवली. “उद्धव ठाकरेंनी फुटलेला पेपर सोडवला आहे. तर दुसरीकडे सध्या शिवसेनेचे असलेले पक्ष चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे कुणाकडे जाणार हा वाद देखील सुरु आहे. दोन्ही गट ‘शिवसेना’ या नावावर आणि धनुष्यबाणावर हक्क सांगत आहेत. तसेच कायदेशीररित्या या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्नही करत आहेत. यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यांवर भाष्य करताना शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.