काल दिवसभरात 22 हजार 431 रुग्णांची नोंद
मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना प्रादुर्भावत काहीशा प्रमाणात घट झाल्याचे चित्र मिळत होते. पण काल दिवसभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. देशात काल 22 हजार 431 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 318 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 24 हजार 602 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 44 हजार 198 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या तीन कोटी 38 लाख 94 हजार 312 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी आतापर्यंत चार लाख 49 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 2,876 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 763 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 65 लाख 67 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.32 टक्के आहे. तर काल दिवसभरात राज्यात 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा डेथरेट 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 929 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर सध्या राज्यात 33 हजार 181 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
काल दिवसभरात आर्थिक राजधानी मुंबईत 621 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 540 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 7,22,636 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत काल दिवसभरात सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4519 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1131 दिवसांवर गेला आहे.