रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकरिता एक आनंदवार्ता आहे.
भारतीय रेल्वेने प्रवाशांना कमी भाड्यात एसी कोचमधून प्रवासाचा आनंद घेता यावा यासाठी तयारी पूर्ण केली आहे.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार AC थ्री टायर इकोनॉमी क्लासचे भाडे ठरविले आहे.
जे सामान्य (AC) एसी थ्री टायर कोचच्या तुलनेत ८ टक्के स्वस्त असेल. यात प्रवाशांना सोयी सुविधांचा आनंद घेता येईल.
भारतीय रेल्वेने वातानुकूलित (3rd AC) गाड्यांमध्ये इकॉनॉमी क्लासची सुविधा सुरू केली आहे.
भारतीय रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अमित मालवीय म्हणाले की, “भारतीय रेल्वेने तीन स्तरीय वातानुकूलित कंपार्टमेंटमध्ये इकॉनॉमी क्लास सुरू केला आहे.
प्रयागराज-जयपूर ट्रेनमध्ये ही सुविधा प्रथमच दिली जात आहे.” “येथे दोन डबे आहेत. बर्थ ७२ वरून ८३ वाढविण्यात आले आहेत, ” असे ते म्हणाले.
“यामुळे लोकांना अधिक जागा मिळेल.
त्यात अधिक प्रगत वैशिष्ट्ये आहेत, विशेषत: अपंगांसाठी. तेथे स्मोक डिटेक्टर आहे.
तसेच, ट्रेनच्या एसएल सीटवर डायनिंग टेबल, मॅगझिन होल्डरची सुविधा आहे, ”मालवीय यांनी ट्रेनच्या वैशिष्ट्यांवर जोडले.पीआरओने म्हटले आहे की त्यामुळे लोकांना अधिक चांगली वैशिष्ट्ये, लोकांना कमी आणि परवडणाऱ्या किमतीत जागा उपलब्ध करून देईल.
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, हे डबे नुकतेच उत्तर मध्य रेल्वे झोनला देण्यात आले आहेत.
याचा वापर ट्रेन क्रमांक 02403 (प्रयागराज-जयपूर एक्सप्रेस) मध्ये ६ सप्टेंबर पासून करण्यात येईल. याकरिता तिकीट बुकिंग शनिवारी २८ ऑगस्ट पासून सुरु झाली आहे.