नागपूर: जिल्हा परीषद अंतर्गत हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय मुलींची निवासी शाळा व शासकीय मुलींचे वसतिगृह येथे नागपूर जिल्हा परिषद शिक्षण सभापती भारती पाटील व महिला व बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे यांनी आज दि ३१ मार्च रोजी सदिच्छा भेट दिली.
मुलींच्या शासकीय वसतिगृहास जिल्हा परिषदेच्या शिक्षण व महिला बाल कल्याण सभापती यांनी दिलेल्या संपूर्ण शाळा व वसतिगृहाच्या भौतिक सुविधेची पाहणी करून, शहरातील वाढत्या तापमानावर चिंता व्यक्त करत संपूर्ण मुलींच्या समस्येचा आढावा घेतला. प्रशासकीय भेटीचे स्वरूप नसले तरी याप्रसंगी वसतिगृहातील सद्यस्थितीची परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी नागपूर जिल्हा परीषदेच्या महिला व बालकल्याण सभापती उज्वलाताई बोढारे, जिल्हा परिषद सदस्य संजयजी जगताप, वानाडोंगरी शहर अध्यक्ष नितेशजी भारती, पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी चव्हाण मैडम, प्रभारी गट शिक्षणाधिकारी ज्योत्सना हरडे, शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका दुशिलाजी मेश्राम, क्रीडा मार्गदर्शक हिंगणा सतीशजी भालेराव प्रामुख्याने उपस्थित होते.
या भेटीदरम्यान शाळेतील सहशिक्षिका प्रियंका डांगेवार, रंजना गजाम, पंकज लेदाडे, कौरती मॅडम व डी एन मेश्राम या सर्व शिक्षक वृंदासह निवासी शाळेतील कर्मचारी सुकेशिनी मेश्राम , रेखा आभारी, वैशाली येसम, माधुरी, सुनिता राऊत, जितेंद्र किरणापुरे, सरोज गजबे, ममता वानखेडे, अल्का गायकवाड, विजयाजी रायसने गृहपाल व शाळेतील तसेच वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनी ,शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.