नागपूर: Google One ने iOS (iOS users) वापरकर्त्यांसाठी स्वतःचे VPN (Virtual Private Network) आणण्यास सुरुवात केली आहे. अँड्रॉइड ( Android) वापरकर्त्यांसाठी ही सेवा एक वर्षाहून जास्त कालावधीपासून उपलब्ध आहे. पण आता आयफोन वापरकर्ते देखील याचा वापर करू शकतील. ज्याप्रकारे अँड्रॉईडवर (Android) हे कार्य करते त्याचप्रमाणे, iOS वरील वापरकर्त्यांना देखील Google One VPN वापरण्यास सक्षम होण्यासाठी गुगल वन प्रीमियम सब्स्क्रिप्शन मेम्बरशिप प्लान (Google One Premium membership plan) असणे आवश्यक असेल.
Google One VPN ही Google ची स्वतःची VPN सेवा आहे जी टेक जायंट प्रीमियम सह सेवा देते. Google चे VPN देखील इंटरनेट ऑफ सिक्योर थिंग्ज अलायन्स (Internet of Secure Things Alliance) (IoXt) द्वारे प्रमाणित आहे. हि गुगलची सेवा फक्त निवडक प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये आता यूएस, कॅनडा आणि यूकेसह 18 देशांचा समावेश आहे.
भारत या यादीत नाही आणि तुमचा प्रीमियम प्लॅन असला तरीही सध्या Google VPN येथे समर्थित नाही. तसेच, Google ने ही सेवा अधिक क्षेत्रांमध्ये आणण्याची योजना आखली आहे जेणेकरून ते भारतात लाँच करू शकतील. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे कि, Google VPN चा वापर करण्याकरिता, तुम्हाला 2 टीबी गुगल वन प्रीमियम मेम्बरशिप किंवा जास्त क्लाऊड स्टोरेज ची आवश्यकता असेल. तुमचे VPN तसेच स्टोरेज ५ मेंबर वापरू शकतात.
Google One VPN ने 3 नवीन फिचर अँड्रॉईड वापरकर्त्यांकरीता आणले आहे:-
Google One ने तीन नवीन फिचर अँड्रॉईड वापरकर्त्यांकरीता आणले आहे. पहिले म्हणजे ‘सेफ डिस्ककनेक्ट’ यामुळे VPN ऍक्टिव्ह असेल तेव्हाच यूझर् ला वेब वापरण्याचा ऍक्सेस मिळेल.
दुसरे म्हणजे अँप बायपास (App Bypass), जे निवडक अँप्सला VPN ऐवजी तुमचे स्टॅंडर्ड कनेक्शन वापरू देतो.
तिसरे म्हणजे Snooze याचे वैशिष्ट्य तुम्हाला काही काळासाठी सेवा तात्पुरते बंद करू देते.v