नागपूर: Alphabet आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई ( Goolgle CEO Sunder Pichai) यांनी म्हटले कि सध्याचे ग्लोबल मायक्रोइकॉनॉमिक परिस्थिती तंत्रज्ञान क्षेत्राला चांगलीच प्रभावित करू शकते.
सध्या जग एका कठीण परिस्थितीतून जात आहे आणि रशिया-यूक्रेनच्या युद्धामुळे कच्चा मालाची कमतरता ,चीन लॉकडाऊन, वाढती महागाई आणि व्याज दर या सगळ्यामुळे मोठे तंत्रज्ञानात थोडे अडथळे येत आहेत.
एका मुलाखतीत पिचाई म्हणाले कि, आर्थिक अस्थिरतेमुळे हायरिंग आणि दीर्घकाळ गुंतवणूकित तंत्रज्ञान क्षेत्राला आणि इंटरनेट दिग्जजांना त्रासाला सामोरे जावे लागेल.
रिसेशनच्या वाढत्या भीतीमुळे, मायक्रोइकॉनॉमिक परिस्थिती तंत्रज्ञान क्षेत्राला चांगलीच प्रभावित करू शकते, असेही ते म्हणाले.
Alphabet चे स्टॉक हे २२ टक्क्यांनी खाली घसरले आहेत ,तसेच तंत्रज्ञान कंपन्या जगातील मार्केटमुळे पिटाळून निघाल्या आहेत. गूगल सगळ्यां सारखेच एक अनिश्चितता समोर नक्कीच पाहतो. Snap (parent company snapchat) यांनी देखील नोकरी देणे थोडे कमी केले आहे. Snap चे सीईओ Evan Spiegel यांनी सांगितले कि ते या वर्षी ५०० नोकऱ्या देणार आहेत. मागील १२ वर्षात २००० कर्मचारी ठेवले होते पण त्यांचा महसूल तितकासा वाढला नाही जितका त्यांना अपेक्षित होता.
जागतिक समस्यांदरम्यान असा अहवाल आला की, Google, Meta आणि Amzon यांना मोठ्या तंत्रज्ञानानाला लक्ष्य करणार्या यूएस काँग्रेसच्या नवीनतम विधेयकाअंतर्गत त्यांच्या जाहिरात व्यवसायातील मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यावे लागेल.