कास्ट्राईब शिक्षक संघटनेने शिक्षकांच्या विविध मागण्याकडे लक्ष वेधले
पुणे: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ कुमठेकर मार्ग, संचालक कार्यालय पुणे येथील शासकीय सभागृहात पूर्वनियोजित बैठक दि. 27/05/2022 रोजी सकाळी 11:00 वा शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अरुण जाधव यांची उपस्थिती होती, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश घोळवे राज्य समन्वयक , संतोष राजगुरू राज्य अध्यक्ष प्रहार शिक्षक व शिकतेर कर्मचारी संघटना ,सतीश कांबळे मराठवाडा अध्यक्ष, विजयकुमार जाधव राज्य उपाध्यक्ष , प्रशांत मोरे पुणे विभागीय अध्यक्ष,राजेश सदावर्ते मराठवाडा सरचिटणीस, राजेंद्र जाधव अतिरिक्त सरचिटणीस, दीपक पंडित जिल्हाध्यक्ष परभणी, रवींद्र चौथमोल अकोला जिल्हाध्यक्ष, संजय ऊके गोंदिया जिल्हाध्यक्ष , राजेंद्र आंधळे ठाणे , प्रवीण मेश्राम नागपूर, श्यामराव जवंजाळ (सोलापूर ) गिरीष वाणी, ( जळगांव) जनार्धन जंगले ( मुंबई) डॉ वानखेडे, जानराव सर (सातारा,) गौतम कांबळे , ( पुणे) चंद्रकांत जाधव ( नाशिक ) परचुंडे आदिंची उपस्थिती होती.
या बैठकीची सुरूवात सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. सर्वप्रथम या बैठकीमध्ये मा दिनकर टेमकर साहेब यांचा समन्वय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रकाशजी घोळवे सर यांनी केले तर सुत्रसंचलन रविंद्र पवार यांनी केले. या बैठकीमध्ये शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने खालील मागण्या निकाली काढण्याबाबत निवेदन दिले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या मागण्या
जिल्हावार बिंदू नामावली आद्ययावत करून रोष्टर प्रमाणे रिक्त पदे भरण्यात यावेत. वेतन आयोगाचा 2 रा व 3 रा हप्ता मिळण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. वस्ती शाळा शिक्षकांची प्रथम नेमणुकी पासून सेवा गृहीत धरून वेतनाचे सर्व लाभ देण्यात यावेत. शाळेतील 100%विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत देण्यात यावे. वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. जालना व अकोला जिल्हा मागील 3 वर्षांपासून offline देयके निधी अभावी पडून आहेत. राज्यातील जि प शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ देण्यात यावा.
जिल्हा परिषद शिक्षण समितीवर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी घेण्यात यावा. दिनांक 10 जून 2014 च्या अधिसूचनेप्रमाणे केंद्रप्रमुख /विस्तारअधिकारी यांच्या पदोन्नतीसाठीची 50% गुणांची अट रद्द करण्यात यावी. प्राथमिक पात्र शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी चा लाभ देण्यात यावा. राज्यातील शिक्षकांची संचमान्यता करून शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे व नंतरच बदली प्रक्रिया राबवावी. सन 2005 नंतर च्या शिक्षककर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.