२४ तासांत ११,६४७ नवे रुग्ण
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागच्या चार दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत आहे. कोरोनाच्या बाबतीत मुंबईतून काही दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरमध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे.
मुंबईत मागच्या २४ तासांत कोरोनाचे ११६४७ नवे रुग्ण आढळून आले असून, या कालावधीत कोरोना संसर्गामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चार दिवसांपूर्वी येथील कोरोना पॉझिटिव्ह दर ३०% होता. तर मागच्या २४ तासात शहरात ६२०९७ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ९४ हजार ७२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६०,४०५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे ९ लाख ५५ हजार ३१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट ११.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,८६८ एवढी झाली आहे.