नागपूर: दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंगरोड महाकाली नगर चौकात माँ जिजाऊ डेअरी च्यावतीने किशोर पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता, माँ जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण नागपूर भाजपचे वार्ड अध्यक्ष (क) बाबारावजी तायडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संघाचे अमोल पुसदकर यांच्या हस्ते माँ जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. डेअरीचे मालक किशोर पवार यांनी जिजामातेवर आपले विचार मांडले. ते म्हणाले, जिजामातांनी शहाजी राजे यांच्या खांद्याला खांदा लावून परकीय आक्रमणांना तोंड दिले. जिजामाता जाधव घराण्यात असून भोसल्यांच्या घराण्यात गेल्या. जिजाऊ मातेचा जन्म 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा, बुलढाणा येथे झाला. जिजाऊंचा वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी शहाजीराजे भोसले यांच्या सोबत विवाह झाला.
संभाजी आणि शिवाजी असे दोन पुत्र होते. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. मातेने शिवबा ला पराक्रमी बनवले आणि आज ते जगजाहीर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाते. माँ जिजाऊ पराक्रमी, धाडसी, स्वाभिमानी, असून जनतेच्या उद्धाराकरिता राजसत्ता मिळविण्याकरिता शोषित, पीडित, समाजाला न्याय देण्याकरिता, जिजामातेने आपले संपूर्ण आयुष्य घातले. म्हणूनच राजमाता राष्ट्रमाता ठरल्यात. असे मत पवार यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी वस्तीतील ज्येष्ठ नागरिक उकंडराव चौधरी, अमोलजी पुसदकर, दीपक खेडकर, मामा राऊत, डॉ. फुलसंगे, हेमंत वाघाडे, दिनेश थोटे, विजय पवार, शाहू पवार, लविश बिनेवाले, जगदिश जुमडे, विजय राव, मोतीराम सिरसाम, धरम अतकरे, वसंत गणोरकर आणि देवराव प्रधान तसेच महिला अध्यक्षा भाग्यलंताताई तळखंडे उपस्थित होत्या.