भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र्रसह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊसाची शक्यता वर्तविली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार प्रादेशिक हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इत्यादी जिल्हे समाविष्ट आहेत.