नागपूर: महाराष्ट्र राज्यामध्ये मागील ७ ते ८ दिवस अतिवृष्टीमुळे सतत मुसळधार पाऊस होत असल्याने विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिराली, व चंद्रपुर या जिल्हामधिल डॅम व तलाव १००% भरले असल्याने सदरील डॅमचे पाणी साठविणे शक्य नसल्याने डॅमचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे, त्यामुळे नदी व नाल्यांना पुर आले असल्याने नदी खालील गावाचा संपर्क तुटलेला आहे. तरी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर येथिल मा. समादेशक तथा नियंत्रक अधिकारी पंकज डहाणे व सहायक समादेशक श्री. कृष्णा सोनटक्के यांचे मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक-०४ मधील पोलीस उपनिरीक्षक एम जे परीहार, पोलीस उपनिरीक्षक- ए सी उसेंडी यांचे सोबत २३ पोलीस अंमलदार यांनी दिनांक.१३.०७.२०२२ रोजी जिल्हा. भंडारा तहसिल. तुमसर मौजा, देवहाडी येथिल वैनगंगा नदीच्या पात्रामधील नरसिम्हा मंदीरामध्ये १५ भावीक अडकले होते सदर भावीकांना बचाव कार्य करुन बाहेर काढुन सुरक्षीत टिकाणी पोहचविण्यात आलेले आहे.
तसेच पथक क्रमांक-०२ मधील पोलीस निरीक्षक प्रदिप भजने, पोलीस उपनिरीक्षक- ए वाय गोखले यांचे सोबत २३ पोलीस अंमलदार यांनी दिनांक.१२.०७.२०२२ ते दिनांक १३.०७.२०२२ रोजी सलग २ दिवस जिल्हा – नागपूर तहसिल सावनेर मौजा-नांदा या टिकाणी कन्हान नदीच्या पुराच्या पात्रामुळे पुलावरुन स्कॉरपीओ वाहन व त्यामधील ६-८ प्रवासी बाहुन गेल्याने त्याचे शोध व बचाव कार्य करुन बाहेर काढण्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील पथकास यश प्राप्त झाले आहे. व सदर प्रवाशांचे मृतदेह संबंधीत पोलीस स्टेशन यांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे.
तसेच पथक क्रमांक-०३ मधील पोलीस निरीक्षक- बादल विश्वास, पोलीस उपनिरीक्षक- बोदर, भारद्वाज व कराळे यांचे सोबत २७ पोलीस अंमलदार यांनी दिनांक ११.०७.२०२२ रोजी पासून सलग ४ दिवस जिल्हा- गडचिरोली तहसिल अहेरी, सिरोंचा व भामरागड या विभागामध्ये वैनगंगा व प्राणहीता नदिला पुर आल्याने सदर पात्रालगतच्या ३२ गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने तेथिल अद्याप पर्यंत १७७ कुंटुंबातील २१०३ नागरीकांना बचाव कार्य करुन सुरक्षीत ठिकाणी पोहचविण्यात आलेले आहे. व बचाव पथकाचे बचाव कार्य सुरु आहे.