राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून चांगलाच गदारोळ झाला आहे. संभ्रम निर्माण झाल्याने ठाकरे सरकारवर चांगलीच टीका होत आहे. भाजपने महाविकासआघाडीवर या मुद्ययावरून खडसवणी केली आहे. ‘टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर पोहचायला आता हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’ असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेच टोपे यांना लगावला आहे.
परीक्षांसंदर्भातील ठाकरे सरकारच्या या निर्णयावर अतुल भातखळकर यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. ‘२४ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी परीक्षार्थींना सकाळी एका जिल्ह्यात आणि दुपारी वेगळ्याच जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ करण्यात आला आहे. मग परीक्षार्थींनी ही परीक्षा द्यायची कशी? त्यामुळे टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पोहोचण्यासाठी आता तुम्ही हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’, असा संतप्त टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
एकाच दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर ते दोन्ही सेंटर वेगवेगळ्या जिल्ह्यात.टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरचीच व्यवस्था करा. आरोग्य विभागाच्या परीक्षेत दुसऱ्यानंद गोंधळ झाला आहे. थोडी तरी लाज शिल्कक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा आणि असे न झाल्यास मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असा इशारा सुद्धा अतुल भातखळकर यांनी दिला. आरोग्य विभागाच्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने साडे आठ लाखांवर जास्त परीक्षार्थीना वेठीस धरण्याचा महापापाची पुनरावृत्ती करण्यास काम महाभकास आघाडी सरकारने केल आहे’,असे देखील ते म्हणाले.