नागपूर: देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी आज १८ जुलै रोजी मतदान होत आहे. २१ जूनला देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहे. सध्याची राजकीय स्थिती बघता द्रौपदी मुर्मू यांचे पारडे राष्ट्रपती पदासाठी जड दिसून येत आहे. त्यांच्या पारडे जड असून त्यांच्या देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कारकीर्द संपणार असून येत्या २१ तारखेला देशामध्ये नवीन राष्ट्रपतींची निवड होणार आहे. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणत्याही व्यक्तीची राष्ट्रपती पदासाठी निवड झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्टपती होण्याचा बहुमान मिळावा अशी मागणी केली जात आहे. विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाकरिता उमेदवार आहेत.
कशी होणार राष्ट्रपती पदाकरिता निवडणूक?
- इलेकट्रोरल कोलेजच्या माध्यमातून राष्टपतीची निवड होणार.
- लोकसभा आणि राज्यसभा खासदार यामध्ये मतदान करतात.
- राज्यातील तसेच दिल्ली आणि पॉंडिचेरीतील विधासभेतील निवडून आलेले सदस्य यामध्ये मतदान करतील.
- नामनिर्देशित सदस्यांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाही.
लोकसभा खासदार -५४३, राज्यसभा खासदार-२३३, देशातील आमदारांची संख्या- ४,०३३
राष्ट्रपती पदासाठी एकूण मतदार – ४,८०९
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मतदान केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले.
भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे खासदार मनमोहन सिंग यांनी संसदेत भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.
आजच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देत आहे.
आमचा विश्वास आहे की राष्ट्रपती निवडणूक कोणत्याही राजकीय निवडणुकीपेक्षा वेगळी असते. हे सर्वोच्च पद आहे आणि योग्य उमेदवाराला मत दिले पाहिजे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला: आदित्य ठाकरे