नागपूर: 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान सुमारे 200 भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये बर्मिंगहॅम येथे पदकांसाठी स्पर्धा
करत आहेत. पण कॉमनवेल्थ गेम्स कसे सुरु झाले, तसेच त्यामागचा इतिहास काय ते समजून घ्या.
कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे काय?
कॉमनवेल्थ गेम्स ही दर चार वर्षांनी होणारी एक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे ज्यामध्ये राष्ट्रकुलमधील विविध संघ भाग घेऊ शकतात. कॉमनवेल्थ राष्ट्रांमुळे या स्पर्धेचं नाव कॉमनवेल्थ पडलं. 1930 साली कॅनडातील हॅमिल्टन शहरात पहिल्या कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याकाळी ही स्पर्धा ‘ब्रिटिश एम्पायर गेम्स’ नावाने ओळखली जायची. 1954 ते 1966 पर्यंत कॉमनवेल्थ गेम्सना ‘ ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स’ म्हटलं गेलं. पुढे 1970 आणि 1974 मध्ये या स्पर्धेचं नाव ‘ब्रिटन कॉमनवेल्थ गेम्स’ होतं. 1978 साली या स्पर्धेला ‘कॉमनवेल्थ गेम्स’ हे नाव पडलं आणि ते अजूनही कायम आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा प्रवेश कसा झाला?
1934 साली दुसरी कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच त्यावेळची ब्रिटीश एम्पायर गेम्स स्पर्धा लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत भारतासह एकूण 16 देशांचे 500 खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, त्यावेळी भारत पारतंत्र्यात असल्याने ब्रिटीशांच्या झेंड्याखाली खेळला होता.
भारताने केवळ कुस्ती आणि अॅथलेटिक्स या दोनच क्रीडा प्रकार भाग घेतला होता.
17 देशांमध्ये भारताने ब्रॉन्झ मेडल पटकावत खातं उघडलं. त्यावेळी भारत बाराव्या स्थानावर होता.
पुरूष कुस्तीच्या 74 किलो वजनी गटात भारताच्या राशीद अन्वर यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 :-
या वर्षी, इंग्लंड 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे .
यावेळेसच्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 आजपर्यंत भारताने विविध खेळांमध्ये ५ सुवर्ण पदक ५ रौप्य पदक ३ कांस्य पदक एकूण -१३ पदके पटकावली आहे.
लॉन बोल्स या खेळात भारताचे पहिलेच पदक आहे. या खेळात भारताने इतिहास बनविला आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मेडल टॅलीमध्ये 13 पदकांसह भारत 6 व्या क्रमांकावर आहे.