मुंबई, पुण्यात ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ
राज्यात 31 ऑक्टोबर रोजी 1399 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 64,50,585 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 20 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,26,67,211 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66,11,078 (10.55 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,65,826 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 867 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 16,658 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि ॲक्टिव्हक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई (Mumbai) – 4 हजार 672
ठाणे (Thane) – 1 हजार 490
पुणे (Pune) – 3 हजार 432
नागपूर (Nagpur) – 74
नाशिक (Nashik)- 583
कोल्हापूर (Kolhapur) – 120
अहमदनगर (Ahmednagar) – 2 हजार 291
सातारा (Satara) – 473
सांगली (Sangli)- 476
औरंगाबाद (Aurnagabad)- 451
प्रमुख शहरांमधील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 3 हजारांहून जास्त ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय मुंबईत 4 हजाराहून अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये देखील सध्या 2 हजारांपेक्षा जास्त ॲक्टिव्ह रूग्ण आहेत.