1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

Huge Fire At Mumbai I मुंबईतील निवासी इमारतीला भीषण आग, 6 ठार, 15 जखमी

नागपूर : मुंबई येथे आज सकाळी निवासी २० मजली इमारतीला भीषण आग लागली(Huge Fire At Mumbai). त्यामुळे ६ जणांनाच मृत्यू झाला असून १५ लोक लोक जखमी झाले आहे (15 people were also injured). अधिकाऱ्यांनी सांगितले की, तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर अन्य जखमींची प्रकृती स्थिर आहे.

मुंबईतील तारदेव परिसरातील गोवालिया टँक येथे गांधी रुग्णालयासमोर कमला इमारतीच्या (Kamla building opposite Gandhi Hospital at Gowalia Tank in Mumbai’s Tardeo area) 18व्या(18th floor)मजल्यावर सकाळी 7 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत आणखी 15 जण जखमी झाले.


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सहा वृद्धांना ऑक्सिजनच्या आधाराची गरज असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग आटोक्यात आली आहे पण धूर प्रचंड आहे. सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “रिलायन्स आणि वोक्हार्ट हॉस्पिटल येथे आगीत जखमी झालेल्यांना सकाळी दाखल केले तेव्हा त्यांना प्रवेश नाकारला होता. आम्ही याबाबत चौकशी करू”.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही लेव्हल-3 (मोठी) आग म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आग विझवण्यासाठी 13 अग्निशमन दल, सात पाण्याचे टँकर आणि इतरांचा सहभाग आहे.

भाजप नेत्या प्रिती गांधी यांनी या घटनेची एक व्हिडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आणि म्हणाल्या, “नेहमीप्रमाणे, सबब बनवले जातील, खोडसाळ कारणे दिली जातील आणि आयुष्य पुढे जाईल. शहर टिकवायचे असेल तर मजबूत राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. मुंबईकर म्हणून, बेहिशेबी वेदना!!”

ही दुर्दैवी घटना आहे, असे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

“ तारदेव, मुंबई येथे झालेल्या भीषण आगीत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना.
जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. जखमींना दाखल करण्यास जवळच्या रुग्णालयांनी नकार दिला, ज्यामुळे अधिक मृत्यू झाले. हे ऐकून धक्का बसला” असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

https://twitter.com/hashtag/MumbaiFire?src=hashtag_click

2h ago @dna tweeted: “#BREAKING | As many as seven persons wer..” – read what others are saying and join the conversation.

https://twitter.com/hashtag/KamalaBuilding?src=hashtag_click

3h ago @TOIMumbai tweeted: “#MumbaiFire Video | A level 3 fire in 2..” – read what others are saying and join the conversation.

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक

November 2nd, 2021 | RAHUL PATIL

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने शंभर कोटी वसुली प्रकरणात अटक केली आहे. अनिल देशमुख यांना अखेर रात्री १२.३०...

आर्यन खानचा मुक्काम 20 पर्यंत तुरुगांतच

October 14th, 2021 | RAHUL PATIL

जामीनासाठी नेमलेले शाहरूखचे दोन्ही वकील अपयशी २ऑक्टोबरला मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवरच्या एका पार्टीमध्ये आर्यन...

महाराष्ट्रात पुन्हा खंजीरचं राजकारण

May 12th, 2022 | RAHUL PATIL

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बळकावल्याचा आरोप भाजप (BJP) नेहमीच क...