भविष्य अंधकारमय मुळे विलिनीकरणावर ठाम
एसटीचे विलिनीकरण व्हावे यासाठी गेले तीन आठवडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. परंतु या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ५००० -४००० -२५०० अशी वेतनवाढ देऊन आकडे फुगवून दाखविलेमुळे जनतेच्या मनात एसटी कर्मचारीविषयी कुठेतरी आक्रोश निर्माण केलाय पण त्यामागील सत्य काय ?
एसटी महामंडळात कर्मचारी वेतनासाठी दर चार वर्षानी करार पध्दत लागू आहे आणि शरद पवारांची निगडीत असलेली संघटना मान्यताप्राप्त असल्याने प्रत्येकवेळी शरद पवार यांनी मध्यस्थी केले शिवाय हा करार झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात खुप मोठी तफावत आहे. याला फक्त शरद पवार जबाबदार आहेत दिनांक २२ -११-२०२१ रोजी सरकार १५० कोटीपर्यतची वेतनवाढ देण्यास सकारात्मक होते. परंतु शरद पवारांनी परिवहनमंत्री आनिल परब यांची भेट घेऊन परत कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केला आणि ही वेतनवाढ ५० कोटीपर्यत आणली.
एसटी कर्मचाऱ्यांचा मागील २०१६-२०२० चा करार अजुन प्रलंबीत आहे २०२० -२०२४ कराराचा अजुन मसुदाच सादर नाही आणि ही वेतनवाढ देतांना ५० कोटीचा बोजा सरकार घेणार असे सांगितले आहे म्हणजे ही वेतनवाढ घेतांना भविष्यात वेतनवाढ मिळणार नाही याचे संकेत दिले आहे.
आज तुमच्या घरात जर एखादा शासकीय कर्मचारी असेल तर त्याला त्याचे मुळवेतन, त्याचा वार्षिक वेतन वाढिचा दर त्याप्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांना मुळ वेतन मिळत नाही वार्षिक वेतनवाढ देखील जो शासकीय कर्मचाऱ्यांना ३% मिळतो तो एसटी कर्मचाऱ्यांना २% दिला जात आहे. हि वेतनवाढ देतांना २०१६ -२०२० व २०२० -२०२४ या कराराबाबत कोणतेही भाष्य मंत्री परब यांनी केलेले नाही त्यामुळे ही वेतनवाढ कर्मचाऱ्यांना परवडणारी नाही शेवटी त्यांना ही कुंटुंब आहे, संसार आहे , दवाखाना आहे याचाही विचार करावा लागेल.
आज आम जनतेला जो त्रास होत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत पण एस टीचे अस्तित्व टिकवणेसाठी विलिनीकरणा शिवाय पर्याय नाही. नाहीतर एसटी तोट्याच कारण देऊन हे एसटी महामंडळ बंद करतील चांगल्या बसेस नाहीत ETIM मशिन नाहीत म्हणून एसटी कर्मचाऱ्यां विषयी चुकीची भावना मनात आणू नका तुमच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर आहेत