नवी मुंबईतील बेलापूर येथे मंदा म्हात्रे यांनी महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…हा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांचा डायलॉग चांगलाच गाजला.
या कार्यक्रमात ते बोलताना म्हणाले होते कि, तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं जाहीर विधान फडणवीसांनी यावेळी बोलताना केलं होत. अशातच आता फडणवीस यांच्या वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.
फडणवीसांना अद्यापही ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे, असंही शरद पवार म्हणाले. याबाबतीत मी थोडा कमी पडतो. चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटत नाही. त्यामुळे मी पुन्हा येईनची त्यांची जखम किती सखोल आहे हे त्यातून दिसतं, अशी टीका देखील शरद पवारांनी केली आहे.