एखाद्या गरीब फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल. ‘पण एखाद्या पदासाठी कुणासमोर हाथ पसरविण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही, असा टोला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पक्षातील लोकांना लगावला आहे. बुलढाणा जिल्ह्ह्यातील बीड येथील कार्यक्रमात पंकजांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना नाव न घेता टीका केली आहे.
माझे माता-पिता, माझे सर्वस्व तुम्ही आहात, तुम्हाला दहा परिक्रमा मी करेन. अजून कुठल्या परिक्रमेची मला गरज नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसासमोर, त्याच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईन. पण कुणासमोर हात पसरून कोणत्या पदाची मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत. एखादी संधी मिळाली नाही तरी चालेल, पण लोकांच्या सेवेची संधी मी सोडणार नाही,’ असे पंकजा म्हणाल्या.