भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे महान प्रणेते होते. प्रज्ञासूर्य म्हणून संपूर्ण विश्वाला मानवतेची समतेची बंधुत्वाची विज्ञानाची आणि ज्ञानाची प्रेरणा देत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्यातील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि विचारांचा आदर्श घ्यावा. प्रेरणा घ्यावी. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
महाविद्यालयांमध्ये निवडणुकीची पद्धत होती. त्यातून संसदीय लोकशाहीचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हायचे. आता महाविद्यालयांमध्ये निवडणूक पद्धत बंद झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाचा आणि त्यातील लोकशाही मूल्यांचा अभ्यास करावा त्यामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकसित होईल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी बडोदा येथे व्यक्त केला.
आताच्या राजकीय परिस्थितीत आजच्या नेत्यांकडून नेतृत्व गुण शिकताना विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा. मोदींनी आपले जीवन पूर्णपणे देशासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे नेतृत्व कसे करावे हे शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून शिकावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.