काश्मीरबाबत पाकिस्तान कधीच आपला घृणास्पद विचार सोडत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत (यूएनजीए) काश्मीर राज्याला पुन्हा एकदा संबोधित केले.पुन्हा एकदा काश्मीरकरीता राग परत उफाळला आहे. पण दरवेळी प्रमाणे या वेळीही त्याला भारताकडून कठोररित्या फटकारले गेले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानला दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देण्याचा इतिहास आहे.
स्नेहा दुबे यांनी राईट तो रिप्लायचा वापर करून सडेतोड उत्तर दिले. त्यांनी म्हटले कि, हि पहिली वेळ नाही, जेव्हा पाकिस्तानच्या नेत्यानी यूएनच्या प्लॅटफॉर्मचा वापर माझ्या देशाच्या विरुद्ध खोटे आणि दुर्भावनापूर्ण प्रचार करायला केला आहे. पाकिस्तानी नेता असे करून स्वतःच्या देशातील दुःखद स्थितीपासून जगाला दुर्लक्षित करायचा प्रयत्न करत आहे.त्यांच्या देशात दहशतवादी उघडपणे फिरतात आणि सामान्य नागरिक, खासदार अल्पसंख्य समूहच्या लोकांसोबत अत्याचार केला जातो आहे.
स्नेहा दुबे यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त केला होत. त्या २०१२ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्यांनतर त्यांनी नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयात झाली होती. २०१४ साली त्यांना भारतीय दूतावासात मैड्रिड येथे पाठवण्यात आले होते.