भंडारा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत भंडारा विश्रामगृह शासकीय वसाहत सिव्हिल लाइन परिसर डॉ आंबेडकर शासकीय वसतिगृह भंडारा तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह भंडारा या परिसरातील तोडण्यात आलेल्या वृक्ष प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले आहे. उपरोक्त विषयकित क्षेत्रे भंडारा सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांच्या अंतर्गत असून भंडारा नगर परिषद मुख्य अधिकारी यांच्या कक्षेत येत असल्याने नगर परिषदेने या परिसरातील झाडे कापण्याची परवानगी दिलेली असल्याचे वृत्तपत्रांमधून माहितीच पडले आहे.
वास्तविक नगर परिषदने दिलेली परवानगी ही वादळामुळे पडलेली झाडे कापण्यासाठी होती पण प्रत्यक्षात मात्र सुस्थितीत असलेली विशाल झाडे बुडापासून कापण्यात आले आहेत. याविषयी शहानिशा केली असता असे निदर्शनास आले आहे, की भंडारा शासकीय विश्रामगृह सर्किटाऊस परिसरातील 60 पेक्षा जास्त अवाढव्य झाडे ज्यामध्ये शिसम सागवान निलगिरी चिचवा केशिया आदी झाडे कापण्यात आलेली आहेत .
आम्ही या परिसरातील रहिवासी असून या वृक्षापासून परिसराचे सौंदर्य होते तसेच पर्यावरण संतुलित नियंत्रित राखण्याचे महत्त्वाचे कार्य या झाडांमुळे होत असते तसेच सिविल लाइन परिसरातील शासकीय वसाहतीतील 30 पेक्षा जास्त वृक्ष, डॉ आंबेडकर मुलांचे वस्तीगृह परिसरात 21 वृक्ष आणि मुलींचे शासकीय वस्तीगृह परिसरातील बरीच झाडे बुडापासून कापण्यात आले आहेत.
“या झाडांपासून कोणतेही नुकसान नसतानादेखील झाडांची विनाकारण कत्तल ही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून वास्तविक परवानगी पेक्षा बरीच जास्त झाडे ज्यामध्ये सिसम सागवान व आधी नमूद केल्याप्रमाणे जातीच्या झाडांची बुडापासून कापणी केल्याचे निदर्शनास येते. ही बाब आमच्यासारख्या पर्यावरण व वृक्ष प्रेमींना खपत नाही व मन विषण्ण करणारी आहे. अशा प्रकारचे वृक्ष कत्तल ही भविष्यात होणार नाही या बद्दलचे संस्कार हे पुढील पिढ्यांपर्यंत पोचविणे हे नागरिक, शासन ,प्रशासन म्हणून आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. या झाडांच्या कतलीने झालेल्या पर्यावरणा चा नैसर्गिक तोटा हा वर्षानुवर्ष न भरून निघणारा आहे हे इथे आम्हाला आवर्जून सांगायचे आहे.तरी आपणास कळकळीची विनंती आहे की या प्रकरणी आपण स्वतः जातीने लक्ष घालून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” असे निवेदनकर्ते अभिजित वंजारी, हेमंत साकोरे, प्रमोद मानापुरे, रोशन काटेखाये, कार्तिक ठोसरे, संजय मते यांनी म्हटले.