नागपूर: सरसंघचालक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज दि २ जून रोजी नागपुरात ज्ञानवापी मशिदीवर भाष्य केले. ते म्हणाले ज्ञानव्यापीला इतिहास आहे तो इतिहास बदलवणे अशक्य आहे. ते आज नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
ज्ञानवापीच्या वादावर परस्पर सामंजस्याने मार्ग काढण्याचे आवाहन भागवत यांनी आज केले. ज्ञानवापी संदर्भात जो इतिहास आहे. त्याला आम्ही बदलवू शकत नाही. त्यावर वाद निर्माण केले जात असून, रोज नवनवे पुरावे सादर केले जात आहेत. मात्र, आम्हाला अयोध्येतील राम मंदिरानंतर आता आंदोलन करायचे नाही,अस सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
प्रत्येक मशिदीत शिवलिंग पाहणे योग्य नाही. हे का केले जात आहे?, असा सवालही भागवत यांनी केला. ज्ञानवापी हा श्रद्धेचा विषय आहे, त्याची लढाई न्यायालयात लढली जात आहे. हे प्रकरण परस्पर संगनमताने मिटवले पाहिजे, असंही मोहन भागवत म्हणाले.