पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी असेच काहीसं वायफळ बरळलेले आहेत. इम्रान खान यांनी बुधवारी सांगितले की, मोबाईल फोनच्या गैरवापरामुळे देशात लैंगिक गुन्हे किंवा बलात्कार वाढत असल्याचा जावई शोध लावून वादास आमंत्रण दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर या विषयावर बोलत असताना इम्रान खान यांनी हे वादग्रस्त विधान लाहोरच्या ग्रेटर इक्बाल पार्कमध्ये केले.
इम्रान खान बुधवारी लाहोरमध्ये पंजाब शिक्षण परिषदेला संबोधित करत होते. या दरम्यान ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह युवकांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच, त्यांचे चारित्र्य घडवण्यासाठी सीरात-ए-नबी (PBUH) च्या सर्वोच्च गुणांबद्दल त्यांना मार्गदर्शन आणि शिक्षित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, महिलांचे लहान कपडे पुरुषांना आकर्षिक करतात. इम्रान खान यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये बराच वादंग निर्माण झाला होता.