नवी दिली : यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल होईल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र, आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. मात्र, दोन वर्षांपर्यंत कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच चूक झाल्यास पुन्हा भरण्याची संधी ही दिली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट मध्ये केली.
टॅक्सबाबतच्या महत्वाच्या घोषणा
करचुकवेगिरी केल्य़ास छापेमारीत सर्व मालमत्ता जप्त होणार
🔹दोन वर्षांपर्यंत कर भरण्याची मुभा,
🔹चूक झाल्यास पुन्हा भरण्याची मुभा
🔹सहकारी सोसायट्यांचा सरचार्ज कर १८.५ टक्क्यांवंरुन १५ टक्क्यांवर
🔹एक कोटी ते १० कोटी उत्पन्न असलेल्या कंपन्यांचे सरचार्ज कर १२ टक्क्यांवरुन ७ टक्के
🔹दिव्यांगांच्या पालकांना करातून सूट,
🔹एनपीएस मर्यादा १० टक्क्यांवरुन १४ टक्क्यांवर
🔹राज्य आणि केंद्र सरकारांना
स्टार्टअप्सना, नव्या कॉर्पोरेट कंपन्यांना एक वर्षांचा करदिलासा कायम
🔹क्रिप्टो उत्पन्नावर ३० टक्के कर
🔹पेन्शनवरील करात सूट