भारतात पुढचे ३ महिने काळजी घेण्याची गरज
युरोपमध्ये गेल्या महिनाभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत ५५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत चिंता व्यक्त कली असून, सध्या युरोपावर लक्ष केंद्रित करण्य़ात आले आहे. युरोप आणि मध्य आशियातील ५३ देशांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग हा जगासाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. युरोपासोबतच चीन आणि अमेरिकेतही कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे त्या त्या देशांची सरकारे चिंतेत आहेत. भारतात सुद्धा उत्सवांचा काळ सुरु आहे, त्यामुळे हजारो लोकं कमेकांकडे जातायेत आणि बाजारपेठांमध्ये गर्दी होते आहे. अशा स्थितीतच सोशल डिस्टन्सिंग, मास्क या बाबींकडे दुर्लक्षही वाढलंय, त्यामुळे देशातही कोरोनाचे रुग्ण येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
युरोपात कसे वाढतायेत रुग्ण
युरोपात गेल्या चार आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या ५५ टक्क्यांनी वाढली आहे. एका ठवड्यात युरोपात १.८ कोटी नवे रुग्ण समोर आले आहेत. जे त्यापूर्वीच्या आठवड्यापेक्षा सहा टक्क्यांनी जास्त आहेत. अर्ध्याहून अधिक युरोपचे लसीकरण झाल्यानंतरही रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंताजनक मानण्यात येते आहे. काही देशांमध्ये ७० टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही रुग्णसंख्या वाढते आहे. यात इटली, जर्मनी, पोर्तुगाल, ग्रीस, फ्रान्स या देशांचा समावेश आहे.
भारतात कोरोनाची काय स्थिती?
देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे, दरदिवशी देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होते आहे. सध्या दरदिवशी १२ हजार नवे रुग्ण सापडत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा आकडा २३ हजारांच्या घरात होता. नव्या केसेस या काही मोजक्या राज्यांत सापडत आहेत. लसीकरणाचा विचार केला तर देशात २२ टक्के लोकसंख्येचं दोन्ही डोसचं लसीकरण झालं आहे. ५२ टक्के लोकसंख्येने एक लस घेतलेली आहे.
भारतासाठी चिंतेची बाब
सण-उत्सवांच्या काळात जनतेकडून होणारी बेपर्वाई ही सर्वात चिंतेची बाब मानण्यात येते आहे. दिवाळीच्या काळात अनेकांनी एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास केला आहे. त्यात रेल्वे, विमाने, बसेस या सगळ्यांचा समावेश आहे.