मेघालायामध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीत खाली कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहे. बसमध्ये एकूण २१ प्रवासी बसले होते. तुरा येथून शिलॉंगला जाणारी बस बुधवारी रात्री १२ वाजता रिंगडी नदीत खाली कोसळली. नदीच्या प्रवाहामुळे बचावकार्य करण्यात अडथळा येत होता. अपघातग्रस्त ठिकाणी त्वरित बचाव पथक तातडीने पाठविण्यात आले होते. चार मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघालयातील या बस मधून २१ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून १६ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून ते जखमी झाले आहे. हा अपघात नोंगश्रम पुलावर झाला जो पूर्व गारो हिल्स आणि पश्चिम खासी हिल्स जिल्ह्याची सीमा आहे. जमखी झालेल्या प्रवाशांनी सांगितले कि, अपघाता दरम्यान बस जोऱ्यात होती. बसच्या समोरच्या भाग पुलाच्या कठड्यावर धडकला आणि बस खाली कोसळली. बसचा चालकाचा देखील या दरम्यान मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ईस्ट गारो हिल्स पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ईस्ट गारो हिल्सचे डिप्टी कमिश्नर स्वप्नील तेम्बे यांनी दोन प्रवाशी बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच लवकरच त्यांना शोधण्यात येईल असं सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीपासून जवळपास १८५ किलोमीटर दूर ही दुर्घटना घडली आहे.