नागपूर: नागपुरात बुधवारी संध्याकाळच्यावेळेस एक व्यक्ती एका खाजगी बँकेत चक्क बंदूक घेऊन शिरला. हा सगळं प्रकार नागपुरातील रामदासपेठत घडला. तो मानून ४० वर्षीय असून त्याला काही मानसिक त्रास असून तो एक खेळण्यातील बंदूक घेऊन बँकेत शिरला. पण यामुळे बँकेत खळबळ उडाली होती. तो व्यक्ती सोमवारी बँकेत आला आणि बँकेतील अधिकाऱ्यांना सांगितले कि, कोणीतरी फसवणूक करून त्याच्या खात्यातील पैसे काढले आहे. त्याने सांगितले कि, ८३००० रुपये त्याच्या खात्यातून कोणीतरी काढले असल्याचा त्याला एक एसएमएस अलर्ट देखील आला होता.
बँकेतील अधिकाऱ्यांनी त्याचे खाते तपासले असता त्या व्यक्तीने स्वतः ते पैसे डिमॅट अकाउंटला ट्रांसफर केले असे बजाज नगर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी सांगितले. बुधवारी संद्याकाळी तो व्यक्ती एक बंदूक घेऊन बँकेत शिरला. बँकेतील शिपायाने त्याला थांबविण्याचा देखील प्रयत्न केला. त्यावेळी त्याने स्वतःला आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले. त्यावेळी शिपायाने त्यांना एक रूम मध्ये बँक मॅनेजर सोबत बसविले. दरम्यान बँकेने पोलसांना फोन केला. त्यानंतर त्या माणसाचे सत्य समोर आले. त्या व्यक्तीचे लग्न झालेलले नसून तो त्याच्या आई सोबत दत्तवाडी भागात राहतो. त्याने पोलिसांना तो भारतीय हवाई दलात पॅरा कमांडो असल्याचे सांगून ओळखपत्र देखील दाखविले. त्या व्यक्तीच्या आईने पोलिसांना माणसाला असलेल्या मानसिक आजाराविषयी माहिती दिली. त्याच्या विरोधात कारवाई करायची कि नाही याविषयी पोलिसांचा विचार सुरु आहे.