नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 6 लाख 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
1115 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समित्यांच्या 31 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या सकाळी 7: 30 ते 5:30 पर्यंत मतदान पार पाडणार आहे, यासाठी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य मतदान केंद्राकडे घेऊन जात आहेत.