देशात मागील २४ तासात कोरोनाचे एकूण १६,१५६ नवीन केसेस समोर आले आहे आणि ७३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. रिकव्हरी रेट ९८.२० टक्के आहे . हा मार्च २०२० नंतर सगळयात जास्ती आहे. कोरोनाचे एकूण केसेसची संख्या एकूण ३४,२३१,८०९ इतकी झाली आहे. तर कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण १६०,९८९ आहे , जे २४३ दिवसात सगळ्यात कमी आहे. मागील २४ तासात कोरोनाचे १७,०९५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३३,६१४,४३४ लोक ठीक झाले आहेत.
आठवड्याचा पॉसिटीव्हिटी रेट १. १९ टक्के आहे जो मागील ३४ दिवसांपेक्षा २ टक्के कमी आहे. तेच दरोरोज पॉसिटीव्हिटी रेट १.२५ टक्के आहे, जे मागील २४ तासात २ टक्क्यांनी कमी आहे. मागील २४ तासात ४९,०९,२५४ लसीकरण झालेले आहे. आतापर्यंत एकूण १,०४,०४,९९,८७३ लसीकरण झालेले आहे.
दिल्ली येथे कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. बुधवारी आलेल्या रिपोर्टनुसार मागील २४ तासात ३८ नवीन केसेस नोंदविण्यात आले आहे. आणि पाच दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. संक्रमण दर देखील ०.०६ टक्के आहे. दिल्ली येथे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३४८ आहे आणि विलगीकरणात १०६ रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांनचा दार ०.०२४ आणि रिकव्हरी दर ९८.२३ टक्के आहे.
बंगलोर येथे डेल्टा एवाई.4.2 चे एकूण ३ केसेस समोर आले आहेत. या नवीन वैरिएंट रुग्णांची संख्या आता ७ झाली आहे. हा वैरिएंट दुसऱ्या देशात खूप वेगाने पसरतो आहे.