1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

आयकर विभागानं लढवली अनोखी शक्कल : ‘राहुल वेड्स अंजली’ असे स्टिकर्स लावून लगीनघाईचा दिखावा

Scam-incometax-thefreemedia

नागपूर: औरंगाबादमधील आयकर खात्याच्याकारवाईमध्ये मोठं घबाड लागलं.

जालन्यातील स्टील कंपन्या, डिलर्स आणि अन्य व्यावसायिकांवर टाकलेल्या छापेमारीची चर्चा सध्या देशभर सुरू आहे. जालन्यातील आयकर छाप्यांत आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. स्टील कारखानदार आणि अन्य व्यावसायिकांच्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यांत 30 लॉकर्सची तपासणी पूर्ण झाली आहे. तर आणखी 30 लॉकर्सचा तपास सुरू आहे. कालपर्यंत 58 कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. तर उर्वरित 30 लॉकर्समध्ये आणखी रोकड आणि अन्य ऐवज हाती लागण्याची शक्यता आहे.

जालन्यात तब्बल 390 कोटींचं घबाड आयकर विभागाच्या हाती लागलं. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागले. तब्बल आठ दिवस चाललेल्या या कारवाईचा मागमूसही जालन्यातल्या लोकांना लागला नाही. इतकी ही कारवाई गुप्त ठेवण्यात आली होती. तब्बल 400 हून अधिक अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सामिल झाले आणि शंभरावर गाड्या त्यासाठी आल्या होत्या. पण ही कारवाई गुप्त ठेवण्यासाठी आयकर विभागानं अनोखी शक्कल लढवली. कारवाईच्या ठिकाणी गाड्यांवर ‘राहुल वेड्स अंजली’ असे स्टिकर्स लावून लगीनघाई असल्याचं चित्रं निर्माण केलं. कारवाईत सापडलेली 58 कोटींची रोकड 35 कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या. या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

गोव्यातील पंचायती निवडणुका लांबणीवर

May 20th, 2022 | RAHUL PATIL

पणजी: पंचायत निवडणुकांच्या संदर्भात ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिलेल्या कायदेशीर सल्ल्यानुसार आम्ही ओबीसीची माहिती...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  नागपुरात

February 17th, 2023 | RENUKA KINHEKAR

नागपूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसीय महाराष्ट्र्र दौऱ्यासाठी आज दि. १७ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सायंकाळी नागपूर...

“….असच चालू राहिले तर, हे लोक एक दिवस सा...

October 13th, 2021 | RAHUL PATIL

राजनाथ सिंह यांच्यावर ओवैसींची टिका हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुं...