—शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून तपासू शकता
नागपूर:देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे निर्णय येताच देशात महागाईचे दर वाढले आहे. एकीकडे सामान्य जनतेला लागणारी दररोजची गोष्ट म्हणजे दुधाचे भाव वाढले तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव चांगलेच आकाशाला भिडले आहे. तसेच LPG गॅसचे भाव देखील वाढले आहे.
दिल्ली येथे एक लिटर पेट्रोलच्या किमती ९६ रुपये २१ पैसे झाले आहे. १३७ दिवसानंतर डिझेलचे भाव ८० पैशानी वाढले आहे. दिल्ली येथे एक लिटर डिझेल ची किंमत ८७ रुपये ४७ पैसे आहे. दिल्ली येथे पेट्रोलच्या किमतींमध्ये ११० दिवसानंतर बदलण्यात आले आहे आणि डिझेलचे भावांमध्ये १३७ दिवसांनंतर बदल करण्यात आले आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी जरी केलेल्या पेट्रोल-डिझेल च्या रेटनुसार महाराष्ट्रात जास्ती बदल झालेला नाही. महाराष्ट्रात त्या राज्यांच्या लिस्ट मध्ये सामील आहे ज्यात पेट्रोलच्या किमती १०० रुपयांच्यावर आहे.
मुंबई,पुणे,नाशिक,नागपूर,कोल्हापूर,अहमदनगर ,अमरावती ,ठाणे येथील पेट्रोलचे आणि डिझेल चे वाढीत दर जाणून घ्या.
मुंबई शहर – पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
बृहन्मुंबई – पेट्रोल 109.99 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.16 रुपये प्रति लिटर
पुणे – पेट्रोल 109.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.43 रुपये प्रति लिटर
नाशिक – पेट्रोल 110.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
नागपूर – पेट्रोल 109.71 रुपये तर डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर – पेट्रोल 110.09 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 92.89 रुपये प्रतिलिटर
अहमदनगर – पेट्रोल 110.14 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.90 रुपये प्रति लिटर
अमरावती – पेट्रोल 111.55 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.74 रुपये प्रति लिटर
ठाणे- पेट्रोल १०९.६६ रुपये तर डिझेल ९२.४२ रुपये प्रति लिटर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल, त्यानंतर त्या दिवसाचे नवीनतम दर तुमच्यापर्यंत संदेशाच्या स्वरूपात येतील.हा संदेश पाठवण्यासाठी, तुम्हाला RSP पेट्रोल पंप डीलर कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मुंबईचा इंधन दर जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही RSP स्पेस 108412 (मुंबईचा डीलर कोड) लिहून 92249 92249 वर पाठवू शकता. तुम्हाला लगेच एसएमएस मिळेल ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर लिहिलेले असतील.