गेल्या २४ तासात ३४,४०३ नवीन कोविड रुग्ण समोर आले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता शुक्रवार पर्यंतच्या कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या एकूण ३,३९,०५६ वर गेली आहे. याच बरोबर देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३,३३,४७,३२५ वर पोहचली आहे.
त्यातच केरळ येथील आकडा वाढला असून २२,१८२ इतके रुग्ण फक्त केरळ मधून समोर आले आहेत. सध्या स्थितीत देशात ४३१ लोकांच्या मृत्यू झाला आहे त्यात फक्त केरळ येथील १७८ लोकांचा मृत्य झाला आहे.
देशातील रुग्णसंख्येत चार दिवसांनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे.’ दररोज ३० हजार पेक्षा कमी रुग्णांची नोंद होत होती. मात्र गुरुवारी सकाळी ३० हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत.
सध्या देशात ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या केरळमधून समोर येत आहेत. गुरुवारी केरळ २२,१८२ नवे रुग्ण समोर आले असून २६,५६३ लोक बरे झाले आहे. १७८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ३ हजार ५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात अली आहे. तर राज्यात ३ हजार २४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आतापर्यंत राज्यात ६३ लाख २० हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. १२ टक्के इतका आहे.