देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. पण अचानक वाढलेल्या रुग्णांच्या मृत्यूसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,४८३ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तब्बल १,३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे १५,६३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दिवसभरात १,९७० रुग्णांनी कोरोनावर मात केली.
देशात गेल्या चार दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या २ हजारांहून अधिक नोंदवण्यात येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी दिवसभरात २ हजार ५४१ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३० लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान,१ हजार ८६२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.८४ टक्के नोंदवण्यात आला होता.