नागपूर: जगभरात सुमारे 50,000 लोकांच्या बेकायदेशीर हेरगिरीच्या प्रकरणात वादात सापडलेले पेगासस सॉफ्टवेअर (Pegasus software) भारताने 2017 मध्ये इस्रायलकडून विकत घेतले होते.अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने याची पुष्टी केली आहे. या अहवालात असे सूचित केले आहे की पेगासस गुप्तचर सॉफ्टवेअर हे 2017 मध्ये भारत आणि इस्रायल दरम्यान झालेल्या US $ 2 अब्ज प्रगत शस्त्रास्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या करारात केंद्रस्थानी होते. अहवालात 2017 जुलै मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईल यात्रेचा उल्लेख केला होता. या दौऱ्यानंतर ते इस्राईलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले होते.
मागील वर्षी भारतासह जगातील नेते, कलाकार, मानवाधिकार कार्यकर्ता, राष्ट्रप्रमुखांच्या कथित हेरगिरीच्या प्रकरणात इस्रायली सॉफ्टवेअरचे नाव समोर आले होते. प्रोजेक्ट पेगासेस ( Project Pegasus) नावाच्या एका तपासात्मक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते कि, पेगासेस सॉफ्टवेअर ने भारतात जवळजवळ 174 पत्रकारांची आणि नेत्यांची हेरगिरी झाली. यामध्ये एमके वेणू, सुशांत सिंह ते काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांसारख्या पत्रकारांची नावे होती. पेगासस स्पायवेअरची निर्मिती इस्रायली कंपनी एनएसओ ( NSO) ग्रुपने केली आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली सायबर वेपन ( ‘The Battle for the World’s Most Powerful Cyberweapon’) च्या युद्धाचे नेतृत्व करताना, NYT ने आपल्या अहवालात म्हटले आहे की इस्रायली फर्म NSO ग्रुप एका दशकापासून “जगभरातील कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपले स्पायवेअर सॉफ्टवेअर वितरित करत आहे” आणि गुप्तचर संस्थांना सबस्क्रिप्शन आधारावर विकत होते. फर्मचा दावा आहे की हे स्पायवेअर ते करू शकते जे कोणीही करू शकत नाही. हे खाजगी कंपनी किवां देशाची गुप्तचर संस्था करू शकत नाही. याद्वारे, कोणत्याही आयफोन किंवा अँड्रॉइड स्मार्टफोनचे एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह मार्गाने हॅक केले जाऊ शकते.
पीटीआय कडून न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टवर सरकारची प्रतिकिया घेण्याचे प्रयत्न केले गेले. पण यावर अजून कोणतेही उत्तर सरकारकडून मिळाले नाही आहे.या सर्वा प्रकारांवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले जात आहे.