पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी आरोप केला की, भारत चीनशी असलेले त्यांचे संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. अल्वी म्हणाले, पाकिस्तानला नेहमीच आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे असतात. पण भारताने पाकिस्तनची ही इच्छा दुर्बलता म्हणून घेतली आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी हे विधान विधानसभेच्या चौथ्या संसदीय वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने, द्विसदनीय संसदेचे कनिष्ठ सभागृहात केले आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर भारतीय हवाई दलाच्या हवाई हल्ल्याची आठवण करून देताना अल्वी म्हणाले, पाकिस्तानला नेहमीच आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे असतात. पण भारताने तो आपला एक कमकुवतपणा मानला आहे . 26 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला आणि बालाकोटमधील जैशच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता.
तत्पूवी भारताने पाकिस्तानला कळवले आहे की त्याला दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणात इस्लामाबादसोबत सामान्य शेजारी संबंध हवे आहेत. भारताने हा संदेश अनेक वेळा दिला आहे की दहशतवादापासून मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे.
अलवींचा काश्मिरी राग
भारत काश्मीरमधील लोकांवर अन्याय करत असल्याचा आरोप अल्वी यांनी केला असून ते म्हणाले, मला भारताला भारतातील अत्याचार थांबवायला सांगायचे आहे आणि काश्मीरमध्ये स्वयंनिर्णयाचे वचन पूर्ण करायचे आहे. अल्वी म्हणाले, पाकिस्तानला अफगाणिस्तानात शांतता हवी आहे आणि पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये एक महत्वाची सकारात्मक भूमिका बजावत आहे.