1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

सिंगापूरयेथील PayNow या पेमेंट सेवेशी UPI जोडले गेले

PayNow

नागपूर: युपीआय म्हणजेच यूनिफाईड पेमेंटने देशभरातील ऑनलाईन सेवेत क्रांती घडवून आणली आहे. हि प्रणाली आता जागतिक असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सीएन  लुंग यांनी सिंगापूर आणि भारत दरम्यान यूपीआयची क्रॉस-बॉर्डर कनेक्टिविटी सेवा सुरु केली आहे. UPI सिंगापूरच्या PayNow  या पेमेंट सेवेशी जोडलेले आहे. यावेळी पीएम मोदी म्हणाले कि UPI-PayNow  लिंकेज हि दोन्ही देशातील नागरिकांसाठी एक भेट आहे, ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. यासाठी मी भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांचे अभिनंदन करतो.

लाँचच्या वेळी पीएम मोदी म्हणाले, ‘आजच्या काळात तंत्राद्यानामुळे फिनटेक क्षेत्र आपल्याला एकमेकांशी जोडते. साधारणपणे ते एका देशातच मर्यादित राहते. परंतु आजचे लाँचिंग क्रॉस-बॉर्डर फिनटेक कनेक्टिविटीमध्ये एका नवीन अध्यायाची सुरवात आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे, प्रशासन आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणात अभूतपूर्व बदल झाले आहे. भारताच्या डिजिटल पायभूत सुविधांच्या ताकदीची हि साक्ष आहे कि कोविडच्या काळात आम्ही कोरोडो लोकांच्या खात्यांमध्ये थेट पैसे पाठवू शकतील.

https://twitter.com/ANI/status/1627906279531491329

 

पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी एक निवेदन जारी केले होते,  या दोन पेमेंट सिस्टीमच्या जोडणीमुळे दोन्ही देशांतील नागरिकांना पैशांचे हस्तांतरण करण्यात मदत होईल. यामुळे सिंगापूरमधील भारतीय प्रवासी, विशेषतः स्थलांतरित कामगार आणि तातडीच्या पैशांची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना आणि सिंगापूरमधून भारतात कमी खर्चात पैसे हस्तांतरित करण्यास मदत होईल.

भारतीय रिझर्व्ह बँकने गेल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी केले. ज्यामुळे G- 20 देशातील प्रवाशांना भारतात त्यांच्या मुक्कामादरम्यान मोबाईल-आधारित यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरण्याची परवानगी देण्यात आली.

यूपीआय हे एक पेमेंट प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण एका मोबाईल अँपमध्ये अनेक बँक खाती एकत्र किंवा लिंक करू शकतो आणि त्याद्वारे आपण बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात कधीही कोठूनही पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतो.

 

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

मनीष सिसोदिया यांना ‘भारतरत्न’ द्यायला हवा

August 23rd, 2022 | RAHUL PATIL

अहमदाबाद: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सरकारी शाळांमध्ये जी सुधारणा केली आहे, ते अन्य राजकीय पक्षांना गेल्या...

… बघा तूमच्या राज्यातील ओमिक्रोनची वाढती रुग्ण...

January 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

भारतात कोरोना विषाणूचे केसेस वाढायला सुरवात झाली आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांनाचे केसेस २२.५ टक्क्यांनी वाढले आहे. मागील...

कर्नाटकातील हिजाब वादावर सुप्रीम कोर्टाने दिला निकाल...

October 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: कर्नाटक हिजाब विवादावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. हिजाब विवादात सुप्रीम कोर्टाच्या दोन्ही जजने वेगवेगळे निर...