झुकेरबर्गच्या फेसबुकला टक्कर देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत योजनेला बळ देण्यासाठी मेड इन इंडिया फेसबुक ‘भारतम’ नावाने लाँच झाले असून गुगल प्ले स्टोरमधून ते फ्री डाऊनलोड करता येणार आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सुमारे २५० चीनी ॲप्स वर बंदी घातल्यानंतर मेड इन इंडिया ॲप्सचा महापूर आला आहे. त्यात आता भारतम सामील झाले आहे. याचा वापर ॲपशिवाय वेबवर सुद्धा करता येणार आहे.
नीरज बिष्ट यांनी हे ॲप आणले असून देशाचे हे पाहिले सोशल नेटवर्किंग ॲप असल्याचा आणि ते अतिशय सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. नीरज यांनी यापूर्वी डिलीव्हरी किंग आणि यास बॉक्स साठी काम केले आहे. आत्तापर्यंत १२ हजार युजर्सनी हे ॲप डाऊनलोड केल्याचे समजते.
या ॲप मध्ये इनबिल्ट व्हिडीओ ॲप दिले गेले असून त्याचे नाव ‘कलाकार’ असे आहे. हे ॲप १५ स्थानिक भाषा सपोर्ट करते. आयओएस साठी ते पुढच्या महिन्यात लाँच होणार आहे. यात फेसबुकची सर्व फिचर्स आहेतच पण त्याशिवाय अन्य जास्तीची फिचर्स सुद्धा दिली गेली आहेत. फेसबुकवर ट्रेडिंग हॅशटॅग दिसत नाहीत ते येथे दिसणार आहेत. त्या हिशोबाने युजर पोस्ट शेअर करू शकतील. शिवाय एकस्प्लोअर, पॉप्युलर,फ्रेंड बनविणे, फॉलो करणे, गेम खेळणे, मुव्ही, प्रोडक्ट खरेदी विक्री मार्केट प्लेस सुद्धा येथे मिळणार आहे.