भारतीय वंशाचे अनिल मेनन यांचा समावेश
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने नव्या चंद्र मोहिमेसाठी (मून मिशनसाठी) १० ट्रेनी अंतराळवीरांची निवड केली आहे. यात भारतीय वंशाचे अनिल मेनन यांना संधी मिळाली आहे. ४५ वर्षांचे मेनन हे नासाच्या क्लास २०२१ या मोहिमेत सहभागी होणार आहेत. अनिल मेनन हे अमेरिकेच्या एअरफोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल होते आणि स्पेसएक्समध्ये फअलाईट सर्जंट म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या निवडलेल्या १० अंतराळवीरांत ६ पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. नासा सुमारे ५० वर्षांनंतर पुन्हा चंद्रमोहीम करते आहे.
अनिल मेनन यांनी भारतातही एक वर्ष घालवले आहे. त्यावेळी पोलिओ अभियानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले होते. भारतातील एकही तराळवीर अद्याप चंद्रावर गेलेला नाही. आत्तापर्यंत चार भारतीय अंतराळात जून आले आहेत. त्यात भारताचे पहिले अंतराळ वीरी राकेश शर्मा, त्यांच्यासह कल्पना चावला, सुनिता विलियम्स आणि राजा चारी हे अंतराळात गेले होते. जर नासाच्या या चंद्र मोहिमेत अनिल मेनन यांना संधी मिळाली, तर चंद्रावर पाऊल टाकणारे ते पहिले भारतीय वंशाचे नागरिक ठरतील.
२ वर्षांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार
या चंद्र मोहिमेत सहभागी होण्यासाठी १२ हजार अर्ज आले होते, त्यातील १० जणांची निवड करण्यात आली आहे. जानेवारीत टेक्सास येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये ते हजेरी लावतील. त्यानंतर २ वर्षे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर हे सर्व नासाच्या आर्टेमिस जेनरेशन प्रोगाममध्ये सहभागी होतील, या मोहिमेंतर्गत २०२५ साली नासा एक महिला आणि एका पुरुषाला चंद्रावर पाठवण्याची योजना करीत आहे.