नागपूर: भारत देश आता शाश्त्रास्त निर्यातदार देश बनणार आहे. या दिशेने फिलिपाइन्ससोबत मोठा करार करण्यात आला आहे. भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र ( supersonic cruise missile BrahMos) फिलिपिन्स या नौदलाला विकणार आहे. (BrahMos Deal) ब्राह्मोस क्षेपणास्त्रची निर्यातीचे हि पहिली परदेशी ऑर्डर आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र ध्वनीच्या तिप्पट म्हणजेच तशी ४३३१ किलोमीटर वेगाने मारा करण्यास सक्षम आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रच्या खरेदीसाठी फिलिपाइन्सने भारतासोबत ( USD 374 million) $३७५ दशलक्ष (रु. २,८१२) करार केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. (The USD 374 million contract is to supply shore-based anti-ship BrahMos missiles to the Philippines’ Navy)
दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या करारावर सह्या केल्या. अतुल राणे,सीईओ, लेफ्टनंट कर्नल आर. नेगी, प्रवीण पाठक उपस्थित होते. चीनच्या आक्रमक वृत्तीला तोंड देत असलेल्या फिलिपाइन्सने भारतासोबत जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस supersonic cruise missile BrahMos खरेदी करण्याचा करार करून चीनला धक्का दिला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, डीआरडीओ (DRDO) (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) आणि ब्रह्मोस एअरोस्पेस (BrahMos Aerospace) हे क्षेपणास्त्र मित्र देशांना निर्यात करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.
डीआरडीओने (DRDO) नुकताच मेड इन इंडिया रडार साठी अमेरिकेसोबत करार केला होता. इतर काही देशांशीही वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याने भारताला लवकरच इतर मित्र देशांकडूनही क्षेपणास्त्र प्रणालीसाठी ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. या क्षेपणास्त्राची क्षमता वाढली असून ते अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज झाले आहे. चीनचा दुसरा शेजारी देश व्हिएतनामही भारताकडून ही क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करू शकतो.