भारत आणि चीन सैन्य पुन्हा एकदा आमने-सामने आल्याची घटना घडली आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात घडली आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैनिक समोरा-समोर आले होते. दोन्ही सैन्यांमध्ये LAC बाबत वेगवेगळ्या धारणा आहेत, त्यावरुनच अनेकदा हे सैनिक समोरा-समोर येतात, इथं स्पष्ट अशी सीमा नसल्याचं मानलं जातं.
संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फेसऑफमध्ये कुणालाही काहीही झालं नाही. भारत-चीन सीमेचं अधिकृतपणे सीमांकन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे दोन्ही देशांमधील LACच्या धारणामध्ये फरक आहे. दोन्ही देशांमधील विद्यमान करार आणि प्रोटोकॉलचे पालन करून, या क्षेत्रांमध्ये शांतता ठेवली जाते.
ऑगस्ट महिन्यांत भारताने गोगरा हाईट्स भागातून चीनी सैन्याला माघारी पाठवलं होतं. तेव्हा त्यांना आधीच्या ठिकाणावर जाण्यास भारतीय सैन्याने मजबूर केलं. यावेळी चर्चेतून तोडगा काढण्यात आला होता.