देशाचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ ठेवण्यामागे प्रसिद्धी मिळवणे हाच बडतर्फ पोलिस अधिकारी सचीन वाझेचा हेतू होता, अशी माहिती एनआयएच्या NIA आरोपपत्रातून समोर आली आहे. वाझे प्रकरणात एनआयएने काल मुंबईच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
अँटिलियाबाहेर सापडलेली स्फोटके, ही स्फोटके ठेवण्यासाठी विक्रोळीतून स्काॅर्पिओची चोरी आणि मनुसख हिरेनची हत्या अशा तीन घटनांबाबत हे आरोपपत्र असून वाझेसह प्रदीप शर्मा आणि अन्य दहा जणांची नावं या आरोपपत्रात आहेत. एनआयएने या प्रकरणात २०० जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून कट रचणे, अपहरण करणे, निष्काळजी पणे वागणे, स्फोटक विना परवाना बाळगणे अशी विविध कलमे लावण्यात आली आहेत.