सोमवारी रात्री व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि मेसेंजर या सेवा जवळजवळ सहा तासांसाठी बंद होत्या. सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे या तिन्ही सेवा बंद पडल्या होत्या. यानंतर मात्र बुधवारी सकाळपासून रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी इंटरनेट आउटेज ट्रॅक करणारी साईट डाऊन डिटेक्टर( DownDetector) ने पण याला रिपोर्ट केले.
साइटच्या मते, जिओ इंटरनेटच्या समस्येमुळे आतापर्यंत ४००० हून अधिक अहवाल आले आहेत. डाऊन डिटेक्टर (DownDetector) वर उपलब्ध आकडेवारीनुसार, बुधवारी ही समस्या नोंदवली गेली. डाउनडिटेक्टरवर लोकांना येणारी जिओच्या अडचणीत वाढ दिसून येते. हे सूचित करते की त्याच्या कनेक्टिव्हिटी मध्ये समस्या आहे.
यानंतर मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर #jiodown ट्रेंड होत होता. अनेकांनी नेटवर्क डाऊन झाल्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.रिलायन्स जिओचे नेटवर्क संपूर्ण देशात बाधित झालं नसलं तरी ट्विटरवरील माहितीनुसार मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि आणखी काही शहरांमध्ये ग्राहकांना समस्या जाणवत होत्या.
जुलै महिन्यात रिलासन्स जिओच्या अॅक्टिव्ह ग्राहकांची संख्या ६१ लाखांनी वाढली. तर भारती एअरटेलच्या च्या युझर्सच्या संख्येत २३ लाखांची वाढ झाल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक ट्रायच्या आकडेवारीवरून समोर आलं. जुलैच्या अखेरिस जिओच्या मोबाईल युझर्सची संख्या ३४.६४ कोटी इतकी होती. जिओचे नेटवर्क डाऊन झाल्यामुळे अनेक मजेशीर मीम लोकांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले.