1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

जो डर गये, वो आझाद है… काँग्रेसने ट्वीट केला राहुल गांधींचा व्हिडिओ

Rahul Gandhi-thefreemedia

नागपूर: काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचे पत्रही लिहिले आहे. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर युथ काँग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना जो डर गये वो आजाद है असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधी यांचा जुना एक व्हिडीओ बीवी श्रीनिवास यांनी शेअर केलाय. यात राहुल गांधी बोलतात की,”जे घाबरत नाहीत आणि काँग्रेसमध्ये नाहीत त्यांना पक्षात घेऊन या. आपल्याला धाडसी लोक हवे आहेत. जे घाबरतात ते आजाद आहेत. तुम्ही जा आरएसएसकडे, पळा.”

श्रीनिवास बीव्ही यांनी आणखी एका ट्विटमध्ये गुलाम नबी आझाद यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटल की, जोपर्यंत सीएम पद, केंद्रीय मंत्रीपद, विरोधी पक्षनेता, राज्यसभा खासदार सीट गुलाम होती तोपर्यंत सगळं ठीक होतं. ५० वर्षांनी संघर्षाची वेळ आली, पक्षाचं ऋण फेडायची वेळ आली तेव्हा आझाद झाले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही गुलाम नबी आझाद यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आझाद यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पक्षात त्यांनी अनेक पदांवर काम केलं.

कुणालाही अपेक्षा नव्हती के ते असं काही पत्र लिहितील. याआधी त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं जेव्हा त्या मेडिकल चेकअपसाठी अमेरिकेला गेल्या होत्या. इंदिरा गांधी, राजी गांधी, सोनिया गांधी यांच्यामुळे ते एक मोठे नेता झाले असंही अशोक गहलोत यांनी म्हटलं.

Avatar

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

Related Post

संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर

November 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. जवळपास १०० दिवसांनी संजय राऊत...

मंदिरापासून तंत्रज्ञानापर्यंत: सरकारने नवीन ‘बौद्धिक...

July 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: राम मंदिर आणि सोमनाथ मंदिरासारख्या “ऐतिहासिक स्थळांच्या” जीर्णोद्धारापासून आणि जालियनवाला बाग स्मारक येथे स्वातंत्...

उमा भारती जेव्हा दुकानात घुसून दारुच्या बाटल्या फोडत...

March 14th, 2022 | RAHUL PATIL

भोपाळ: देशात दारुच्या व्यसनापायी अनेकांचे संसार उधवस्त होत असतांना यावर तोडगा काढता येते अशक्य असल्याचे सर्वदूर चित्र सारख...