मध्य प्रदेशातील खजुराहो येथून कालिचरण महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धर्मसंसदेमध्ये कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. याचे पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कालीचरण महाराजाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून कालीचरणविरोधात संतापाची लाट उसळली होती.
पोलिसांकडून कालीचरण महाराजाचा शोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली