१५ ते १७ वयोगटातील मुलींच्या मार्गदर्शनसाठी अचानक भेट
नागपूर/हिंगणा: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा एक्टीव्ह मोडमध्ये आली असल्याने, ग्रामीण भागातही गुनेहेगारी प्रवृत्तीला चाप बसावा यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून त्या अनुषंगाने मागील काही दिवसापासून हिंगणा तहसील अंतर्गत घडणा-या लहान मोठ्या घडामोडीवर पोलीस विशेष लक्ष देऊन आहे. या निमित्ताने पोलीस उप निरीक्षक अमृता सूर्यवंशी यांनी मोंढा येथील कांचनगंगा टाऊनशीप येथे आज अचानक भेट देऊन १५ ते १७ वयोगटातील तरूणींना मार्गदर्शन केले.
हिंगणा स्थित कांचनगंगा सोसायटी ही तालुक्यातील मोठी टाऊनशीप असून येथे बरीच कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यापैकी काही फ्लैट धारकांनी एजंटच्या माध्यमातून भाडेतत्वावर फ्लैट तालुक्यातील विविध कॉलेजात शिकत असलेल्या तरूण तरुणींना फ्लैट भाड्याने दिले आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोना रूगणसंख्या कमी असल्याने जिल्हाधिका-यांनी शाळा, कॉलेज उघडण्यास परवानगी दिली असल्याने महाविद्यालयीन तरूण तरूणींच्या हुल्लडबाजीला ऊत आल्याचे चित्र परीसरात दिसायला लागले आहे.
शहरातील किंवा इतर तालुक्यातून पालक आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी हिंगणा येथे मुलींना शिक्षणासाठी पाठवित असतात परंतु खर्चिक बाब असल्याने त्यांना कांचनगंगा व इतर सोसायटीत भाडेकरू म्हणून शिक्षणासाठी सोय करून देतात. परंतु वयात आलेल्या मुली कॉलेजच्या निमित्ताने इतरत्र उनाडटप्पू मुलांसोबत भटकतांना दिसतात हे त्यांच्या करीयरच्या दृष्टीने योग्य नसल्याची खंत पो उ नि अमृता सूर्यवंशी यांनी बोलून दाखवली. सोसायटीतील सर्व तरूण शिकाऊ मुला मुलींना मार्गदर्शन म्हणून आज त्यांनी भेट देत योग्य सल्ला देऊन मुलींची समजूत काढून त्यांना त्यांच्या पालकांच्या तळमळीची जाणीव करून दिली.
अचानक दिलेल्या मारागदर्शनपर भेटीत सोसायटीतील शिक्षणप्रेमी तसेच ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंगणा पोलीस प्रशासनातर्फे पो उप नि अमृता सूर्यवंशी यांच्यासह अतुल तलमले, शेख इस्माईल, विनोद दुरतकर आणि चमू उपस्थित होती.