1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

स्वतःचा पक्ष स्थापन करुन धनंजय मुंडेंविरोधात परळीतून निवडणूक लढवणार करुणा शर्मा?

dhananjay munde
Spread the love

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी कथित आरोप करून चर्चेत राहिलेल्या करुणा शर्मा यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलेल्या असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आपल्या नवीन पक्षाची घोषणा करुणा शर्मा यांनी केली असून लवकरच अहमदनगरमध्ये सभा घेऊन त्या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्यांच्या पक्षाचे नाव शिवशक्ती सेना असेल असे करुणा शर्मां यांनी म्हटले आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस अहमदनगरमध्ये मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा आणि निवडणूक लढवण्या संदर्भातील इतर माहिती जाहीर करणार, अशी माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे. दरम्यान, मला मध्यंतरी अनेक राजकीय पक्षांनी प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते, पण कोणत्याही पक्षात न जाता आपण स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याप्रमाणेच राज्यात अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यापैकी अनेक महिला माझ्या संपर्कात असल्याचा दावाही करुणा शर्मा यांनी केला. दरम्यान पक्षस्थापनेनंतर आपण निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच बीडमधील परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढवण्याचा मानस करुणा शर्मा यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचे निधन...

    January 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष...

    ओबीसी पदाधिकाऱ्यांचे मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन २५ म...

    May 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: ओबीसी पदाधिका-यांचे बुधवार दि २५ मे रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. राष्ट्...

    भाजपच्या ‘घुम जाओ’ वृत्तीमुळे लोकशाहीच्य...

    June 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमाझी भूमिका संपली,पत्रकारांवर जवाबदारी त्यांनी भूमिका मांडावी : ज्वाला धोटे नागपूर: एक जागरुक नागरिक म्हणून...