काबुल हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या आयएस खोरासान व तालिबान याच्यातील मतभेद स्पष्ट झाले आहेत आणि अमेरिकेने ड्रोन हल्ला करून त्यांच्या सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार आयएस खोरासान भारतात पाय पसरू लागले आहे. सरकारी हवाला देऊन दिलेल्या या बातमीत अफगाणिस्थान मध्ये पाय रोवल्यावर आता आयएस खोरासान भारतात आणि मध्य आशियात जिहादची तयारी करत आहे.
दहशतवादी हल्ले करण्यासाठी आयएस के युवकांची भरती मोठ्या प्रमाणावर करत आहे. खलीफा शासन स्थापन करणे हा त्यांच्या मुख्य अजेंडा असून मुंबई आणि केरळ मधील अनेक तरुण या संघटनेत सामील झाले आहेत.
कट्टर इस्लामी विचारधारेच्या या युवकांना आयएस केचे मोठे आकर्षण असल्याचे दिसून आले आहे. जम्मू काश्मीर भागात हल्ले करणाऱ्या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहमदने कंधार सीमा बेस अफगाणीस्थान मधील हेलमंद येथे हलविला आहे. २००८ मुंबई हल्ल्याचा कट रचलेल्या लष्कर ए तोएबा यांनीही त्याचे तळ पूर्व अफगाणीस्थान मधील कुणार येथे हलविले असून अफगाणिस्थान मध्ये या दहशतवादी संघटना फळफळू शकतील अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे रिपोर्ट गुप्तचर संस्थांना मिळाले आहेत. यामुळे नजीकच्या काळात भारतात जिहाद सारख्या घटना वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.