नागपुर: स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे याकरिता जय विदर्भ पार्टीची स्थापना होऊन एक वर्ष झाले असून, पार्टीच्या सदस्यता मोहिमेसाठी घरोघरी जाऊन सदस्यता मोहीमेला सुरुवात करणार असल्याचे जय विदर्भ पार्टीच्या वतीने आज दि २५ एप्रिल रोजी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत अध्यक्ष अरुण केदार यांनी माहिती दिली. पत्रपरिषदेत विष्णू आष्टीकर सरचिटणीस, मुकेश मासूरकर उपाध्यक्ष, गुलाबराव धांडे सहसचिव, पोलीट ब्युरो सदस्य तात्यासाहेब मते, अरविंद भोसले, सुनिता येरणे, दक्षिण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजेंद्र सतई आदींची उपस्थिती होती.
जय विदर्भ पार्टी यांच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यासाठी जय विदर्भ पार्टी सदस्यांनी सहभागी व्हावे. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशी त्यांची मुख्य मागणी आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण, नक्षलवाद, दुष्काळ राज्याचा न झालेला विकास, अपूर्ण सिंचन रखडलेली पर्यटन केंद्रे, न झालेले रस्ते, या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे ‘स्वतंत्र विदर्भ राज्य झालीच पाहिजे ‘ याकरिता जय विदर्भ पार्टीची स्थापना करण्यात आल्याचे अध्यक्ष अरूण केदार यांनी सांगितले.
जय विदर्भ पार्टी सत्याला धरून व भारतीय घटनेला अनुसरून केलेल्या तत्वांचा व कायद्याला अनुसरून सामाजिक धर्मविरहित व लोकशाही तत्वाला धरून एकसंघ राहून भारतीय लोकसंघाचे कल्याणकारी करणारी संस्था म्हणून कार्य करणार आहे.
जय विदर्भ पार्टीची ध्येय आणि उद्दिष्टे :
अ) स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणे.
ब) विदर्भातील शेतकऱ्याचे सर्वांगबाजूने विकास घडवून आणणे.
क) उद्योगधंद्यांचा विकास करणे.
i ) जास्तीत-जास्त उद्योगधंदे विदर्भात असणाऱ्या खनिज संपत्तीवर आधारित उद्योग सुरु करणे.
ii) शेतीवर उत्पादित उत्पनांवर व वस्तूवर, पिकांवर, शेतीवर आधारित उद्योगधंदे सुरु करणे.
iii) उद्योगांना प्रोत्साहित करण्याकरिता स्वस्त दरात वीज पुरविणे.
iv) विदर्भाची गरज पूर्ण करून उरलेली वीज विकून विदर्भाचे उत्पन्न वाढविणे.
v) घरगुती उद्योगांना प्रोत्साहन देणे.
vi) घरगुती उद्योगाला अनुदान देणे व त्याचे व्यावसायिकरण करणे.
ड) विजनिर्मितीकडे लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त उपयोगात आणून रोजगार निर्मिती करणे
इ) शैक्षणिक संस्था
i) रोजगार निर्मित शैक्षणिक संस्था सुरु करणे.
ii) शैक्षणिक संस्थेचा दर्जा वाढवणे.
ii) असणाऱ्या शैक्षणिक संस्था जागतिक दर्जाच्या बरोबरीने आणणे.
iv) बारावीपर्यंत कोणताही भेदभाव न करता शिक्षण मोफत करणे.
v) गणवेश व पुस्तक मोफत पुरविणे.
vi) विद्यार्थ्यांना विदर्भ राज्य पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच विदर्भ लोकसेवा आयोग च्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
vii) तांत्रिक शिक्षण सुरू करणे.